Nashik
08042784087
+919225123839

गुडघेदुखीने हैराण? आयुर्वेदाचे वरदान Knee Joint Pa...

गुडघेदुखीने हैराण? आयुर्वेदाचे वरदान Knee Joint Pain and Ayurveda काही विकारात सुरुवातीला तात्पुरती औषधे घेऊन कामचलावू उपचार केले जातात. आजार वाढल्यानंतर मग आयुर्वेदिय उपचारांकडे वळले जाते. अशा विकारांपैकी एक विकार म्हणजे गुडघेदुखी. सर्वसामान्यपणे अशा पेशंटकडून विचारले जाणारे प्रश्‍न म्हणजे ‘डॉक्टर, माझा एक गुडघा का दुखतो?’ ‘डॉक्टर हा संधीवात आहे का?’ ‘अमूक एक औषध आमच्या नातेवाईकांनी घेतले, त्यांचे गुडघे दुखणे कमी आले; पण त्याच औषधांनी माझे का कमी येत नाहीत?’ ‘डॉक्टर, वजन वाढल्याने गुडघे दुखतात, असे म्हणतात आणि वजन कमी करण्यासाठी मी चालावे म्हटले तर शक्य होत नाही. याला काय करणार?’ ‘डॉक्टर, माझ्या गुडघ्यात पाणी तर झाले नाही ना?’ असे भीतीयुक्त प्रश्‍नसुद्धा काहीजणांकडून केले जातात. गुडघेदुखीच्या प्रत्येक पेशंटची वेगवेगळी अवस्था असते. कोणाचे लहापणापासून गुडघे दुखत असतात, तर कोणाचे इतर सांध्यांच्या जोडीला गुडघे दुखत असतात. काहींना चालण्याने बरे वाटते. तर अनेकांना चालण्याने वाढते. कोणाच्या गुडघ्यावर सूज असते, तर कोणाच्या गुडघ्यावर अजिबात सूज नसते. कोणाला तेल लावल्याने, शेकण्याने बरे वाटते, तर कोणाला वाटत नाही. कोणी गुडघ्याचे व्यायाम करतो तर कोणी कॅप वापरत असतो. एकाच गुडघेदुखीच्या या अनेक अवस्था असण्याचे कारण की गुडघेदुखी ही तक्रार एक दिसत असली तरी ती वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या आजाराच्या परिणामी होत असते. रुग्णाची अवस्था ः- काहीजण नियमित वेदनाशामक औषधे घेत असतात. यामध्ये काहींना स्टिरॉईडसारख्या औषधांची सवय जडलेली असते. आणि विविध दुष्परिणामही झालेले असतात. काहीजणांनी गुडघ्यातील इंजेक्शनचा वापर केलेला असतो. कोणी विशिष्ठ लेप लावत असतात. तर कोणी जाहिरातीला भुलून एखाद्या आयुर्वेदिय गोळ्या किंवा काढा घेत असतात. काही जण नुसते गुडघे शेकत असतात. ‘आयुर्वेदिक औषध’ असे म्हणून प्रत्यक्षात गुपचूप इंग्लिश गोळ्या कुटून त्याचे मिश्रण करून देणार्‍या ‘भोंदू वैद्यांकडून’ फसलेले आणि अशा भेसळयुक्त औषधांचे कालांतराने दुष्परिणाम झालेले पेशंटही पाहण्यात आहेत. गुडघे दुखत असतानाही ‘कायमचे चालणे बंद होईल’ या भीतीने किंवा ‘व्यायाम केल्यावर गुडघेदुखी बरी होईल’ या गैरसमजाणे किंवा ‘जोडीची मैत्रीण चालायला जाते म्हणून’ क्रेझ म्हणून स्वतःच्या गुडघेदुखीचा विचार न करता फिरायला जाणार्‍या आणि आजार वाढविणार्‍या भगिनीही आढळतात. गुडघेदुखीची कारणे ः- आघात झाल्याने, गुडघ्यातील हाडांची झीज झाल्यामुळे, गुडघ्यातील वंगण कमी झाल्यामुळे, गुडघ्यातील आतील आवरणाला सूज आल्यामुळे गुडघ्यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे, गुडघ्यात पाणी झाल्यामुळे, र्‍हुमॅटॉईड, आरथ्रॉयटीसमुळे, रक्तातील युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे, अतिस्थूलपणामुळे सातत्याने उभे राहून ताण आल्यामुळे, इत्यादी विविध कारणांमुळे गुडघेदुखी ही तक्रार होत असते. गुडघेदुखीवर शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार करताना या कारणांची निश्‍चिती करूनच उपचार केले जातात. प्रत्येकाची गुडघेदुखी ही वेगवेगळ्या कारणांमुळे असते, त्यामुळे उपचारही प्रत्येकाचे भिन्न असतात. मणक्याच्या विकारामुळे गुडघेदुखी ः- काहीवेळा गुडघेदुखीच्या रुग्णांत कंबर फारशी दुखत नसतानादेखील एक्स-रे केल्यानंतर अथवा एमआरआय केल्यानंतर मणक्याची सूज, मणक्याची झीज, मणक्यात गॅप आलली असणे, चकती सरकलेली असणे असे दोष आढळून येतात. ज्यामुळे कंबरेतून खाली येणार्‍या शीरांवर दाब पडत असतो व त्यामुळे गुडघेदुखी जास्त जाणवत असते, अशावेळी मणक्याच्या विकारावर उपचार केल्यानंतर गुडघेदुखीला आराम मिळतो. असे अनुभवास येते. त्यामुळे गुडघेदुखीवर पुरेसे उपचार करूनदेखील आराम मिळत नसल्यास एकवेळा हा मणक्याचा तर आजार नसेल ना? असे समजून मणक्याच्या तपासण्या करून घ्याव्यात. शास्त्रीय आयुर्वेदिय उपचार ः- शास्त्रीय आयुर्वेदिय उपचार करताना पेशंटचे वय किती आहे? त्याचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे? पूर्वी घडलेली कष्टाची कामे अथवा आघात, त्याचा दैनंदिन आहार, त्याची प्रकृती, वजन, स्थूलपणा अथवा कृशपणा तो राहतो तो प्रदेश पाण्याशी अथवा थंडीशी असणारा संपर्क त्याची सर्वसाधारण शरीराची शक्ती, पचनशक्ती, चालू असणारा ऋतू, मानसिक अवस्था इ.चे परीक्षण करून तसेच असणारी विविध व्यसने, शरीरातील मधुमेह किंवा रक्तदाब इत्यादी इतर विकार व त्यावरील चालू असणारे उपचार, ताणतणाव, गुडघेदुखीसाठी घेतलेे गेलेले विविध उपचार या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेऊन आणि नंतरच गुडघेदुखीचे कारणे निश्‍चित करून मगच त्यावर उपचार केले जातात. उपचार करताना पोटातील वातशामक औषधे, स्थानिक उपचार, आहारामधील पथ्य आणि, योग्य असे व्यायाम यांचा ‘एकाचवेळी सांघिक वापर’ केला जातो. त्यामुळे होणारा उपयोगही लवकर होऊन जास्त काळ टिकणारा मिळतो. स्थानिक उपचार ः- शतावरी, अश्‍वगंधा, दशमूळ, निर्गुडी, लसूण, एरंड, कण्हेर, प्रसारिणी, बला, सुंटी, रास्ना, इत्यादी वातशामक औषधांनी सिद्ध केलेली वेगवेगळ्या तेलांनी, मसाज करणे आणि नंतर वाफेने अथवा काढ्यांनी ते अथवा तेलाने अथवा पाल्याने शेकणे तर काहीवेळा विविध वनस्पतीत चूर्णांचे लेप लावणे, हे स्थानिक उपचार केले जातात. गुडघ्यातील हाडांची झीज झालेली असल्यास आयुर्वेदातील बस्ती हा पंचकर्म उपचार केल्याने खूप चांगला आराम मिळतो. पोटातील औषधे ः- वर सांगितलेले वातशामक वनस्पतीत औषधांचे काढे, घनसार आणि गुग्गुळ, आणि अभ्रक, माक्षिक लीठ, गोंदती, नाग, सुवर्ण, रौप्य, कुकुटककांडत्वक्, इत्यादी भस्मे यांच्या एकत्रीकरणातून झालेल्या विविध संयुक्त गोळ्या पेशंटचे प्रकृती, वय, आजाराची तीव्रता इत्यादींचा सर्वांगीण विचार करून वापरले जातात. व्यायाम महत्त्वाचे ः- आयुर्वेदिक उपचारांच्या जोडीलाच वात प्रकोप करणारा आहार टाळणे महत्त्वाचे असते. दूध, सुंठ, पांढरे तीळ, बाभळीच्या डिंकाची पावडर, उडीद डाळ, आले लसून मेथ्या इ.चा वैद्य सल्ल्याने उपयोग करावा. आपल्या दैनंदिन कष्टाचा विचार करून योग्य असे व्यायाम करावेत. गुडघ्याला आधार देण्यासाठी ‘नी कॅप’ अवश्य वापरावी. थंड वारा गारठा, ओलेपणा, पाण्यातील काम, ए. सी., सतत उभे राहणे, जास्त चालणे यापासून गुडघ्याचे रक्षण करावे.
 2019-11-18T06:38:19

footerhc