
2019-11-17T04:39:49
Weight Loss Diet or Exercise? सडपातळ होण्यासाठी व्यायाम की आहार? वेट लॉस वा वजन घटविण्याची सध्या साथ आली आहे . किशोरवयीन मुले असोत , तरुण - तरुणी असोत वा वयस्कर , प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. लोकांना आठवड्यात एक वा दोन किलो वजन कमी करायचे असते . त्यासाठी प्लॅन्स आखले जातात . हे प्लॅन्स जितके वास्तववादी असतील , तितके ते यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते . यासंबंधात काही तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजेत . पोहणे , जॉगींग आणि सायकलिंग या व्यायाम प्रकारांपेक्षाही आपला आहार हा वजन कमी करण्यासाठी जास्त परिणामकारक ठरतो , असे अलीकडेच करण्यात आलेल्या अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे . रोजचा आहार पौष्टिक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे . आपण जिममध्ये स्नायूंना ताण देणारे व्यायामाचे प्रकार करतो . वजनेही उचलतो . यामुळे व्यायाम केल्यानंतर आपल्याला सडकून भूक लागते . त्यामुळे आपण जास्त अन्नपदार्थ खातो . यामुळे वजन कमी करण्याच्या आपल्या उद्दिष्टावर विपरीत परिणाम होतो . आपल्या पोटाच्या वरच्या आणि खालच्या भागात चरबीचे प्रमाण जास्त असते . हे प्रमाण मुख्यतः आपल्या लाइफ स्टाइलशी संबंधित असते . काही तज्ज्ञांच्या मते यामागे आनुवंशिक कारणे असतात . हार्मोन्स वा संप्रेरकांच्या पाझरण्यात चढउतार असल्यासही चरबीत वाढ होते . जिम जॉइन करणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केवळ व्यायाम केल्याने आपले वजन नियंत्रणात राहात नाही . आपला दररोजचा आहार कसा आहे ही गोष्ट त्याकरता महत्त्वाची ठरते . ' तुमच्या आहारातून तुम्ही कोणते पदार्थ वगळता हे तुम्ही करत असलेल्या व्यायामापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. तुम्ही दिवसभरात जे अन्न खाता आणि जी पेये घेता त्यातून तुमच्या शरीरात कॅलरी वा उष्मांक तयार होतात . एकूण कॅलरींपैकी फार थोड्या कॅलरी व्यायामाने संपुष्टात आणता येतात . कॅलरी आहाराद्वारेच जास्त नियंत्रित होऊ शकतात . व्यायामामुळे सर्वसाधारण व्यक्तीच्या ५ ते १५ टक्के कॅलरी नष्ट होऊ शकतात . शरीरात अन्नाद्वारे शंभर टक्के कॅलरी तयार होत असतात . व्यायामाने त्यात फार मोठा फरक पडत नाही . आपल्या शरीरातील कॅलरी वाढवण्यास कोणते अन्नपदार्थ कारणीभूत ठरतात , याची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे . तशी ती घेतली , तर आपण साखरयुक्त आणि पिष्ठमय पदार्थ आहारात किती असावेत ते निश्चित करू शकू . कोणते अन्नपदार्थ पोषक आहेत हे जाणून घेऊनच आपण त्यांचा समावेश आहारात केला पाहिजे . व्यायामानंतर भूक लागतेच . त्यामुळे व्यायामानंतर काय खायचे हे निश्चित केल्यास आपल्याला व्यायामाचा फायदा होऊ शकतो . व्यायाम आणि आहार यांची सांगड घातल्यास वजन घटविण्याचे उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकते . आपण घेत असलेला नाश्ता आणि जेवण हे आपल्या नियंत्रणात असले पाहिजे . या आहारातून आपल्याला दिवसभरासाठीची ऊर्जाही मिळाली पाहिजे . याकरता आहारात फळांचा समावेश अवश्य करावा . वजन नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा याकरता काही टिप्स शेअर करता येतील . १ . प्रोटीनयुक्त आहार असावा - अंडी , ओट , मासे , हरभरा डाळ , मोड आलेली धान्ये , पनीर यांचा समावेश तुमच्या नाश्त्यात हवा . २ . पिष्ठमय पदार्थ , साखर टाळा - शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवणारे अन्नपदार्थ टाळले पाहिजेत . ३ . प्रिझर्व्हव्हेटीवज दूर ठेवा - पदार्थ टिकविण्यासाठी रसायने , कृत्रिम रंग आदींचा वापर केला जातो . फूडपॅक्स घेताना त्यांच्या लेबलवरील माहिती वाचण्याची सावधगिरी बाळगा . प्रिझर्व्हव्हेटीवजचा वापर असलेले पदार्थ विकत घेऊ नका . त्यांच्यात सोडिअमचे प्रमाण जास्त असल्याने ते घातक असतात . ४ . पूर्णपणे भाजलेले पदार्थ टाळा चिप्स , समोसा यासारखे फ्राइड फूड टाळा , या पदार्थांमुळे वजन वाढतेच , पण सुस्तीही येते . अधिक माहितीसाठी संपर्क सुखायु हॉस्पिटल कॅनडा कॉर्नर नासिक 7420004242