
2020-02-04T05:48:03
गरज ड जीवनसत्त्वाची ची! -शरीराचे कार्य नीट चालण्यासाठी असंख्य घटक कारणीभूत असतात. -हाडांसाठी कॅल्शिअम आवश्यक असते हे अनेकांना माहिती असते आणि त्यामुळे दूध आवश्यकही ठरते. -मात्र या कॅल्शिअमचा उपयोग करण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. -‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता ही खरे तर लहानपणापासूनच सुरू होते, पण आपल्याकडे साधारण पन्नाशीनंतर त्याचे परिणाम जाणवू लागतात. -हाडे दुखणे, ठिसूळ होणे, घसरून पडल्याने हाड फ्रॅक्चर होऊन अंथरुणाला खिळणे अशा अनेक दुखण्यांचे कारण ‘ड’ जीवनसत्त्वात असते. - महत्त्वाचे म्हणजे या दोन्हीसोबत हार्मोन्सही महत्त्वाची भूमिका बजावतात. -त्यामुळे हाडे दुखतात तेव्हा फक्त कॅल्शिअमची नाही तर या तिन्ही घटकांचा मेळ चुकलेला असतो. -हाडे दुखत असल्याची तक्रार घेऊन अनेकजण येतात. साधारणत: पन्नाशीनंतर हा त्रास सुरू होतो आणि त्यातही विशेषत्वाने स्त्रियांना अधिक होतो. -हाडे मजबूत करण्यासाठी दूध आवश्यक आहे हे तर शाळेपासून शिकवले जाते. -मात्र दुधातील कॅल्शिअम हाडांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच हाडे मजबूत करण्यासाठी इतरही काही घटक महत्त्वाचे ठरतात. ‘ड’ जीवनसत्त्वाचा कॅल्शिअमशी संबंध: -‘ड’ जीवनसत्त्व हे कॅल्शिअमचा पोलीस आहे. संरक्षणकर्ता. -हाडांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी कॅल्शिअम आवश्यक आहे. -कॅल्शिअमचा मुख्य स्रोत म्हणजे दूध. हिरव्या पालेभाज्या आदीमधून ते शरीरात जात असते. -हे कॅल्शिअम हाडांना योग्य त्या प्रकारे शोषता यावे यासाठी जो घटक महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे ‘ड’ जीवनसत्त्व. -दूध किंवा तत्सम पदार्थामधून मोठय़ा प्रमाणावर कॅल्शिअम शरीरात गेले आणि शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर मग या कॅल्शिअमचा म्हणावा तेवढा उपयोग होत नाही. -‘ड’ जीवनसत्त्वासाठी सकाळच्या साधारण आठ ते नऊ वाजताच्या कोवळ्या उन्हाव्यतिरिक्त इतर चांगला स्रोत नाही. -मासे, कॉर्डलिव्हर ऑइल, अंडी यातून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते, मात्र अत्यल्प प्रमाणात. त्यामुळे सर्व भार सकाळच्या उन्हावरच. -शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता आढळली की त्याच्या सप्लीमेंट्स घ्याव्या लागतात.