
2020-01-30T08:09:33
व्हेरीकोज व्हेन्स म्हणजे काय? रक्त साठल्याने किंवा साकळल्याने फुगलेल्या किवा आकाराने वाढलेल्या रक्तवाहिन्यांना व्हेरीकोज व्हेन्स म्हणतात. त्वचेखालील या रक्तवाहिन्या स्पष्टपणे पाहिल्या जाऊ शकतात. या वळलेल्या, फुगलेल्या, निळ्या रंगाच्या दिसतात. सहसा, त्या पायात होतात, पण शरीराच्या इतर भागातही होऊ शकतात. •याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत? - पाय दुखणे -पायावर सूज येणे -पायात किंवा पोटरीमधे गोळे / पेटके येणे. -पोटरीवर आणि माड्यांवर हिरव्या रंगाच्या रक्तवाहिन्यांचे जाळे दिसणे -वेरीकोज रक्तवाहिन्या असलेल्या ठिकाणी खाज होणे. -त्वचा कोरडी आणि खरखरीत होणे. -त्वचा नाजूक होणे ज्यावर काही इजा झाल्यास ती लवकर बरी न होणे. •याची प्रमुख कारणं काय आहेत? -रक्तवाहिन्यांच्या भिंती आणि झडपा कमकुवत झाल्यामुळे - बऱ्याच काळाकरता उभे राहणे उदा. पेंटर, बस/ट्रेन कंडक्टर्स, शिक्षक वगैरे - स्त्रियांमध्ये हा धोका जास्त असतो -गरोदरपणा - स्थूलता - वृद्धत्त्व - व्हेरीकोज व्हेन्सचा कौटुबिक पूर्वेतिहास •निदानाची खात्री करून घेण्यासाठी अंजियोग्राम करण्यास सुचविले जाते •उपचार -कॉम्प्रेशन स्टॉकिंग्ज - अॅब्लेशन थेरपी - रेडियो फ्रिक्वेन्सी अॅब्लेशन , लेझर अॅब्लेशनचा वापर करून व्हेरीकोज्ड रक्तवाहिन्या नष्ट करण्यात येतात . - शस्त्रक्रिया ( फ्लेबेक्टोमी ) - रक्तप्रवाहासाठी वेगळ्या रक्तवाहिन्या असल्यामुळे खराब झालेल्या रक्तवाहिन्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकल्या जातात -गंभीर प्रकारात खराब रक्तवाहिन्यांचे लिगेशन आणि स्ट्रीपिंग केले जाते . •स्वत घेता येण्यासारखी काळजी: - जास्त काळासाठी उभे राह नये . - दिवसातून 3 - 4 वेळा पाय वरील दिशेने उंचावून ठेवावेत -पायाकडील भागावर येणारा दाब टाळण्यासाठी वजन कमी करावे . - रक्तप्रवाहात सुधारणा येण्यासाठी शारीरिक हालचाली जास्त कराव्यात . चालणे किंवा पोहणे हे उत्तम पर्याय आहेत . -एखादी जखम किवा फोड झाला असल्यास त्याची योग्य काळजी घ्यावी - त्वचा मॉइस्चराईज्ड ठेवावी . ती कोरडी होऊन तिला चिरा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी