
2020-01-29T05:51:34
नवजात बाळाची मालिश करताना काय काळजी घ्यावी: •नवजात बाळाची मालिश केल्यानं त्याचं शरीर मोकळं तर होतंच शिवाय बाळाची हाडं आणि मसल्स सुद्धा मजबूत होत असतात. •मालिश करणं म्हणजे बाळासाठी एकप्रकारचा व्यायामच असतो. •मालिश केल्यानं बाळाला चांगली भूक लागते सोबतच त्याला छान झोप येते, म्हणून मालिश करणं नवजात बाळासाठी खूप फायदेशीर असतं. •मालिश करण्याची एक योग्य पद्धत आहे. त्याच पद्धतीनं मालिश केली जाणं फायदेशीर ठरतं. •बाळाची मालिश करतांना जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. • मालिश कधी केली पाहिजे आणि मालिश केल्यानंतर कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवं. 1.बाळाची मालिश करताना सर्वप्रथम तेल डायरेक्ट बाळाच्या शरीरावर टाकू नये. आपल्या हातावर तेल घ्यावं ते दोन्ही हातांनी मग बाळाच्या शरीरावर लावावं. असं केल्यानं तेलाचा थंडपणा बाळाला जाणवत नाही, याऐवजी आईच्या हाताची उब बाळाला तेलासोबत मिळते. 2.जेव्हा आपण बाळाला मालिश करत असू तेव्हा मालिशची सुरूवात नेहमी पायांपासून करावी. मग छाती आणि पाठीची मालिश करावी. 3.मालिशची सुरूवात नेहमी बाळाला पाठीवर झोपवून करावी. त्यानंतर बाळाला पालथं करून पाठीला मालिश करावी. 4.मालिशची एक वेळ निश्चित करून ठेवावी. ज्यावेळी एक दिवस मालिश केली असेल त्याचवेळी दररोज मालिश करावी. असं केल्यानं बाळाची झोपेची, उठण्याची आणि जेवण्याची वेळ निश्चित ठरते. 5.बाळाला मालिश केल्यानंतर त्याला थोडा वेळ तसंच राहू द्यावं. लगेच आंघोळ घालू नये. तेल जिरू द्यावं. 6.हिवाळ्यात बाळाला मालिश करताना एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे जर खूप थंडी असेल तर बाळाला मालिश बंद खोलीत हिटर लावून किंवा कोवळ्या उन्हात बसूल करावी. कडाक्याच्या थंडीत तेल कोमट करून मग मालिश करावी. मालिश केल्यानंतर बाळाला कोमट पाण्यानं आंघोळ घालावी. 7.बाळाला खाऊ घातल्यानंतर कधीही मालिश करू नये. त्यानं पोटावर दाब पडून बाळाला उल्टी होऊ शकते. बाळाला मालिश ही खाऊ घालण्यापूर्वी किंवा जेवल्यानंतर कमीतकमी दोन तासांनी करावी. 8.बाळाला नाजुक हातानं मालिश करावी. जोरानं मालिश करू नये. बाळाची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे हलक्या हातानंच मालिश करावी. 9.बाळाच्या डोक्याला गोल आकार देण्यासाठी मोहरीच्या उशीवर त्याला झोपवावं. 10.मग आता नवमातांनी लक्षात ठेवावं आणि बाळाची मालिश करावी, जेणेकरून आपलं बाळ सुदृढ होईल.