
2020-01-14T07:32:51
रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? -डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे. -सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. बैठं काम आणि जंकफूड, पिझ्झा, बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड. अशात विविध जंतू, विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. -दैनंदिन जीवनात प्रतिकारशक्ती ही दिवसेंदिवस कमी झालेली दिसते. बदलते वातावरण, अपूर्ण आहार, कमी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे जंतूसंसर्ग जास्त जाणवतो. -अपूर्ण ज्ञान, अस्वच्छ राहणीमान, गर्दीच्या ठिकाणाचं वास्तव्य यामुळे आजारांत वाढ होत आहे. *प्रतिकारशक्ती कशी वाढवावी ? -याचं सोपे उत्तर म्हणजे नैसर्गिक जीवन जगणं. नुसतंच काम न करता संपूर्ण पौष्टिक आहार, यात फळ आणि पालेभाज्यांचा समावेश असावा. रोज एक फळ खाणं आवश्यक आहे. आहारामध्ये जंकफूड असलं तरी परंतु, आठवड्यातून अगदी एक किंवा दोन वेळाच. आहाराची वेळ निश्चित असावी. 1)झोपः २४ तासात कमीतकमी आठ तास झोप आवश्यक आहे. यात शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) साधारण राहतो. अपुऱ्या झोपेमुळे हृदयासह मेंदूवर जास्त दुष्परिणाम दिसून येतात. 2)वजनः जन्मतः उंचीनुसार वजनाचं प्रयोजन असतं. परंतु, स्थूलपणामुळे सगळे अवयव क्षमतेपेक्षा जास्त काम करत असतात. याकरीता नियमित आहार आणि मर्यादित अन्न खाणं गरजेचं असतं. 3)व्यायामः खाऊन आलेली ऊर्जा खर्च करणं हे गरजेचं असतं. म्हणूनच २४ तासात एक तास व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. शरीराचा समतोल साधण्यासाठी प्रतिकारशक्ती गरजेची आहे. आधुनिक काळात नवीन नवीन येणाऱ्या जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी औषधं, उपचारांपेक्षा नैसर्गिकरित्या आजार टाळता आले पाहिजेत. हाच खरा मोठा उपाय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये.