
2019-11-15T13:43:09
आधुनिक वैद्यक मान्यतेनुसार सामान्य सर्दी एन्फ्लूएंजा व्हायरसमुळे होते. थंडीमुळे नाही. हा व्हायरस थंडीच्या काळात वेगाने वाढतो. आपण थंडीच्या दिवसात सर्दीने अधिक ग्रासले जातो, कारण आपण बहुतांश वेळ घरात असतो. यामुळे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात व्हायरसला पकडणे आणि सोडण्याची गती वाढते. मोकळ्या हवेत जाण्याने फुफ्फुसांमधील हवेचा संचार वाढतो. यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो. थंडीच्या दिवसात दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण सर्दीचे असतात. बहुतांश रुग्णांना ही चिंता सतावत असते की, थंडीत सर्दीपासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं, खूप धूळ आणि प्रदूषित हवेत न जाणं उत्तम, तसंच इतरही थोडीशी काळजी घेतली तर थंडीत आजारांपासून दूर राहणं सहजशक्य आहे. हातांची स्वच्छता सूक्ष्मजीव म्हणजे व्हायरस आणि जीवाणुंपासून वाचण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही तुमचे हात दिवसातून अनेकवेळा धुवा. तुम्ही अनेक लोकांशी हस्तांदोलन करता, वस्तूंना स्पर्श करता म्हणजे दरवाजाचं हँडल, लिफ्ट बटण, इतर अनेक गोष्टी यामुळे संसर्ग पसरतो . जर शक्य असेल तर कोमट पाण्याने हात धुवा . जर पाण्याने हात धुणं शक्य नसेल तर सॅनिटाइझरचा वापर करा . प्रवासादरम्यान सावधगिरी जर तुम्ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत असाल किंवा गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर संसर्गापासून बचाव करण्यासाठी अशा लोकांपासून दूर राहा , जे शिंकत आहेत किंवा खोकत आहेत . जर तुम्ही स्वतः एक रुग्ण असाल तर खोकताना किंवा शिकताना डिस्पोजेबल टिश्यू पेपरचा वापर करा . जर अचानक खोकला किंवा शिंक आली तर हाताऐवजी रुमाल धरा , म्हणजे संसर्ग पसरणार नाही . ड जीवनसत्वाची गरज तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर थोडासा वेळ घालवा . कारण जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही तुमच्या फुफ्फुसांना ताज्या हवेने स्वच्छ करता आणि सूर्य प्रकाशातून ड जीवनसत्त्व शोषून घेतात . साधारण ९० टक्के भारतीय ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेने त्रस्त आहेत . पुरेशा प्रमाणात ड जीवनसत्त्व शोधून घेण्यासाठी दुपारी १२ ते ३ या वेळात साधारण ४५ मिनिटं उन्हात थांबा . आठवडाभरात साधारण ४ - ५ दिवस शरीराला सूर्य प्रकाश मिळायला हवा . यावेळेस अंगावर कमीत कमी कपडे असावेत , तसंच सनस्क्रीन लावलेलं नसावं. पेशी , हाडांच्या आरोग्यासाठी आणि ऊर्जा स्तर वाढविण्यासाठी ड जीवनसत्त्वयुक्त आहाराचं सेवन करायला हवं . खूपपाणी प्या. संसर्गापासून बचाव करण्यासाठी थंडीच्या दिवसात नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे . संपूर्ण दिवसात थोडा थोडा व्यायाम , हालचाल केल्यानेही चांगले परिणाम मिळतात . पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि क जीवनसत्त्वयुक्त आहाराच सेवन करा . क जीवनसत्त्व रोगप्रतिकार क्षमता मजबूत करण्यास फायदेशीर ठरते . फळ आणि भाज्यांमध्ये क आणि ड जीवनसत्त्व असतं . हेसुद्धा लक्षात ठेवा थंडीच्या सुरुवातीला तुम्ही फ्लूचं इंजेक्शन घेऊ शकता . पुरेशा झोपेद्वारे तुम्ही तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकता . त्यामुळे झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्या . आहाराची काळजी थंडीच्या दिवसात आपल्याला आपल्या आहाराविषयी अधिक सजग आणि सतर्क होण्याची गरज आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स थंडीमध्ये थंड पेयांबरोबरच ग्रीन टी, कॉफी, सूप, गरम पाणी, इतर द्रव पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे शरीरात व्हायरसची निर्मिती होण्याची शक्यता कमी होते. तसंच कॅलरीच्या सेवनाकडे लक्ष असू द्या, कारण याच काळात अनेकांचं वजन वाढतं. ते खातात जास्त, पण व्यायाम कमी करतात. खरंतर याउलट करायला हवं. अधिक माहितीसाठी संपर्क सुखायु हॉस्पिटल कॅनडा कॉर्नर नासिक 7420004242