
2019-11-14T04:34:58
वयाच्या तिशी नंतर स्त्रियांनी पुढील आजारापासून जागरूक रहावे Women health issues after 30s थायरॉईड ग्रंथी Thyroid गळ्याच्या खालच्या बाजूला आतून ही ग्रंथी असते. त्यात t3 t4 स्त्रवत असतात. त्यांची मात्रा असंतुलित झाल्यास त्याचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे वजन वाढणे किंवा कमी होणे, थकवा येणे, चिडचिड होणे, अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. वयाची तिशी ओलांडली की स्त्रियांनी काही चाचण्या करणे आवश्यक असते. वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत स्त्रियांना आजार होण्याची शक्यता तशी कमी असते कारण या वयापर्यंत त्यांची प्रतिकार क्षमता चांगली असते. परंतु जसजसं वय वाढत जातं तशी प्रतिकारशक्तीही कमी होत जाते व काही आजार डोके वर काढू शकतात. त्यामुळे आरोग्यासंबंधी जागरूक राहून काही टेस्ट करून घेणे आवश्यक असते. उच्च रक्तदाब High Blood Pressure अलीकडच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे महिला उच्च रक्तदाबाच्या शिकार होतात. मेनोपॉजच्या अवस्थेत हा आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक असते. हाडांची घनता कमी होणे Osteoporosis मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. कारण हाडे स्नायू आणि मांसपेशीं दुखायला लागतात. म्हणून स्त्रियांनी मेनोपॉजनंतर डॉक्टरांकडे अवश्य जाऊन सल्ला घ्यावा. ही समस्या जाणवत असेल तर शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी योग्य सल्ल्याने उपचार सुरू करावेत. ब्रेस्ट कॅन्सर Breast Cancer वयाची तिशी उलटल्यानंतर प्रत्येक स्त्रीने ब्रेस्ट कॅन्सर विषयी जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्हाला काखेत कुठल्याही स्वरूपाची गाठ किंवा दुखणं जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती टेस्ट करून घ्या किंवा स्त्रीरोग प्रसूती तज्ञांच्या सल्ल्याने स्तनांची तपासणी करून घ्या. गर्भाशया संबंधी आजार विवाहित स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी जागरूक राहून योग्य त्या तपासण्या करून डॉक्टरांचा सल्ला घेत राहावा. ॲनिमिया Anemia अनेक भारतीय महिलांमध्ये रक्ताची कमतरता असतेच. त्यामुळे थकवा जाणवतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, डोळे पांढरे दिसू लागतात, केस गळू लागतात यासाठी स्त्रियांनी वर्षातून एकदा हिमोग्लोबिनची तपासणी करणे आवश्यक असते. अशा संदर्भात कुठल्याही प्रकारची मदत किंवा सल्ला आवश्यक असल्यास सुखायु हॉस्पिटल नासिक येथे संपर्क साधावा 7420004242