
2019-11-12T04:58:42
आयुर्वेदात अक्रोडचं महत्त्व सांगितलं आहे. संशोधनात देखील हे सिद्ध झालं आहे. सुक्यामेव्यातही सर्वाधिक अँटीऑक्सिडंट अक्रोडमध्ये आढळतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीकोनातून अक्रोड सर्वाधिक फायद्याचे ठरतात. त्यामुळेच व्यक्ती निरोगी रहाते. अक्रोडमध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात, ज्यामध्ये उच्च प्रतीची प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्त्व, खनिज, फायबर्स इत्यादी आढळतात. हे सगळे घटक शरीरासाठी खूप आवश्यक ठरतात. अक्रोडमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं. सांधेदुखीत अक्रोडचं सेवन अतिशय फायदेशीर ठरतं. रजोनिवृत्तीनंतर महिलांनी दररोज अक्रोडचं सेवन करायला हवं. जर खोकल्याची समस्या असेल तर अक्रोड तुपात भाजून खाण्याने फायदा होतो. थंडीच्या दिवसात अक्रोडचं सेवन विशेष फायदेशीर ठरतं. यामुळे मेंदू निरोगी राहतो. अक्रोड शक्तीवर्धक आहे आणि बल आणि वीर्यही वाढवतो. मेंदुला शांत ठेवतो. परिणामी झोप खूप छान येते. जर गळ्याशी संबंधित कोणतीही समस्या जाणवत असेल तर कच्च्या अक्रोडच्या काढ्याने गुळण्या करण्याने फायदा होतो. अक्रोडच्या सेवनाने वायू, पित्त शांत होते. मूत्रसंबंधी आजारातही अक्रोडचं सेवन लाभदायक ठरतं. अक्रोडच्या सेवनाने स्तनपान करणाऱ्या महिलांमधील दुधाचं प्रमाण वाढतं. अक्रोडचं तेलही खूप फायदेशीर ठरतं. यामुळे पोटातील जंत नाहीसे होतात. अपचनाचा जर त्रास असेल तर दुधात अक्रोडचं तेल मिसळून पिण्याने समस्या दूर होते. जर श्वान दंश झाला तर प्रभावित भागावर दोन चमचे अक्रोडचं तेल एक कप गरम पाण्यात मिसळून दिवसातून तीन वेळा प्यावे. तोंडाचा पॅरालिसिस झाल्यास अक्रोडच्या तेलाने मालिश करणं फायदेशीर ठरतं. अक्रोडचं साल केवळ पोटातील जंत नाहीसं करत असं नाही तर अपचनाचा त्रासही दूर करते.