
2019-04-26T17:08:16
पोट साफ होण्यासाठी महत्वाच्या सूचना विहार दररोज कमीत कमी ४ किलोमीटर पायी चालावे दुपारी झोपू नये रात्रीचे जेवण सायंकाळी ७च्या आत करावे जेवणानंतरशतपावलीकरावी जेवण आणि झोप यांत कमीतकमी ३ तासांचे अंतर असावे दररोज ४ लीटर पाणी २४ तासांत मोजून प्यावे दिवसभरात कमीत कमी २ ग्लास कोमट पाणी प्यावे आहार आठवड्यातून एकदा तरी रात्री झोपतांना कोठ्यानुसार एरंडेल तेल घ्यावे दररोज रात्री झोपतांना १ ग्लास कोमट दुधात ३ – ४ चमचे गाईचे शुद्ध तूप टाकून प्यावे दररोज रात्री १ ग्लास पाण्यात मुठभर मनुके भिजवून ठेवावे व सकाळी अनशेपोटी चावून खावे रात्रीच्या जेवणानंतर न चुकता ग्लासभर पाण्यात इसबगोल चूर्ण घ्यावे High Fibre Diet म्हणजेच अधिक तंतुमय पदार्थ असलेले अन्न खावे जसे संत्रे, मोसंबी (ज्यूस करण्यापेक्षा चावून चोथ्यासकट खावे.) शक्य तेव्हा फळे सालीसकट खावीत. दररोज एक असे फळ खावे आंबवलेले पदार्थ जसे ब्रेड, इडली , डोसा इत्यादी टाळावेत दररोज २ गाजर , २काकडी , १ tomato वअर्धे बीट खावे (Salads चे प्रमाण वाढवावे) मांसाहारा नंतर पाण्याचे प्रमाण वाढवावे सब्जा किंवा इसबगोल असलेले सरबत प्यावे जेवतांना थोडी भूक राहू द्यावी