
2019-11-14T15:25:10
रजोनिवृत्ती मध्ये हाडांचे आरोग्य! Menopause and Osteoporosis रजोनिवृत्तीनंतर हाडांवर परिणाम होऊन त्याचा ठिसूळपणा वाढतो. त्यामुळे स्त्रियांनी रजोनिवृत्तीच्या काळात हाडांचे आरोग्य चांगले ठेवायला हवे. शरीरातील हाडांमध्ये कॉलेजेन व अस्थीमज्जेत कॅल्शियम, फॉस्फरस, मँगॅनीज, बोरॉन, सिलिकॉन अशी खनिजं ठासून भरलेली असतात. या सर्वांमुळे हाडे मजबूत राहतात व त्यांना ताकद मिळते. मात्र जेव्हा या कॉलेजेन मध्ये पोकळी निर्माण होते तेव्हा पर्यायाने हाडे पोकळ होतात. हाडे पोकळ होतात म्हणजे नक्की काय होते? हाडांची घनता कमी होऊन ते नाजूक बनतात. अगदी विनाकारण सुद्धा हाड मोडून फ्रॅक्चर होते. पण जर योग्य काळजी घेतली तर मात्र हा आजार टाळता येऊ शकतो. आपल्या हाडांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप असतं किंबहुना ते असावंच लागतं. एस्ट्रोजन नावाच्या हार्मोन्सचे प्रमाण कमी झाल्यास रजोनिवृत्तीनंतर हाडे पोकळ होऊ लागतात. हाडांची घनता पस्तिशी मध्ये सर्वात जास्त असते त्यानंतर स्त्रिया व पुरुष दोघांमध्येही हाडांचे घनत्व कमी होऊ लागते. स्त्रियांमध्ये हे प्रमाण रजोनिवृत्तीनंतर झपाट्याने वाढत जाते. हात पाय कंबर दुखणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरुवातीला उद्भवू लागतात. जर विकार वाढला तर पाठीला पोक येणे इत्यादी लक्षणे दिसतात. हा आजार कशामुळे वाढतो? आहारात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास किंवा संधिवात ऍलर्जी, दमा किंवा त्वचेच्या काही विकारांमध्ये स्टरोईडचा इलाज चालू असल्यास आजाराचे प्रमाण व तीव्रता वाढते. चहा-कॉफी, दारू, तंबाखू, शीतपेये या गोष्टींच्या अतिसेवनामुळे हाडावर अनिष्ट परिणाम होतो. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे देखील हा विकार वाढतो. निदान व उपचार सोनोग्राफीचा उपयोग करून पायाच्या तळव्यांची घनता मोजली जाते.हाडांचा ठिसूळपणा वाढणं आणि त्याचे दुष्परिणाम टाळायचे असल्यास वयाच्या पस्तिशी पासूनच काळजी घ्यायला हवी. आहारातील सोया मध्ये फायटो एस्ट्रोजन किंवा प्लांट एस्ट्रोजन असते. त्यामुळे रात्री घाम येणे, अचानक मूड बदलणं, हॉट फ्लशेस या समस्या कमी होतात. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्याने हृदयाचे विकार कमी होतात व हाडांमधील या धातूंची घनता वाढत जाते. आहारात काय खावं? योग्य प्रमाणात कॅल्शियम घेणे तसेच दूध व दुधाचे पदार्थ, सोयाबीन, खसखस, तीळ, जरदाळू, पालक, मासे, कोबी, सीताफळ या पदार्थांमधून कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळू शकते. योग्य व्यायामाची जोड मिळाल्यास हाडांचे आरोग्य चांगले राहते. अधिक माहिती आणि उपचारांसाठी संपर्क 7420004242 सुखायु हॉस्पिटल कॅनडा कॉर्नर नासिक