
2019-11-08T04:02:04
Frozen Shoulder फ्रोजन शोल्डर आजारावर मराठीत माहिती बरेचदा अनेकांना खांद्यात, मानेत वेदना अथवा खांदे आखडल्याचा अनुभव येतो. खांद्यात वेदना होत असतील आणि कडकपणा जाणवत असेल, तर त्याकडे अजिबातच दुर्लक्ष करायला नको. फ्रोझन शोल्डर हा इतका गंभीर प्रकार आहे की, हा त्रास सुरू झाल्यावर व्यक्तीला रोजच्या दिनक्रमात स्वत: आंघोळ करणं अथवा कपडे घालण्यासारख्या अवघड गोष्टी करणं कठीण होतं. अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. फ्रोजन शोल्डर या त्रासात वेदनेचा कालावधी हा एक वर्षापासून तीन वर्षांपर्यंत सातत्याने वाढत जातो आणि त्यावेळी शस्त्रक्रिया हाच पर्याय समोर उरतो. हात हे खांद्याच्या पातळीपेक्षा वर उचलणं जमत नाही आणि खांद्याची हालचाल, हात बाहेरच्या बाजूला वळवणं, कोपरापासून हाताची हालचाल आणि कोपरा दुमडणं यावर सगळ्याच बाजूंनी बंधनं येतात. ही लक्षणं दिसायला लागल्यावर खांद्यात वेदना निर्माण होण्याची वाट न बघता तातडीने एक्सपर्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे. फ्रोजन शोल्डरची वैज्ञानिक कारणं खांदा हा शरीरातील असा भाग आहे ज्यात अनेकदा कडकपणा आल्याचा अनेकांना अनुभव येतो. हाडं, हाडांना जोडणारा सेतू म्हणजेच अस्थिबंधन आणि स्नायूबंधन यातून खांद्याला आकार आलेला असतो. या तिन्ही भागातील पेशींची एक कॅप्सूल बनते, ज्यामुळे खांद्याची हालचाल सुरळीत होते. या कॅप्सूलमधे पेशींची वाढ झाल्यावर तिथे सूज येते, तो भाग कडक बनायला लागतो आणि त्यामुळे खांद्याच्या हालचालीवर बंधनं येतात. आधी झालेली जखम, मुका मार, डायबिटीज, आधी झालेल्या खांद्यावर अथवा आसपासच्या भागात झालेल्या शस्त्रक्रिया, थायरॉईडचा त्रास, कार्डियोव्हॅस्क्युलर डीसीजेस, ट्यूबरक्युलॉसिस आणि कंपवात अशा अनेक कारणांमुळे हा त्रास वाढण्याची शक्यता असते. निदान आणि उपचार फ्रोझन शोल्डर हा त्रास किती सौम्य अथवा गंभीर आहे, याचं निदान आधी होणं महत्त्वाचं असतं. मुळात या त्रासावर उपचार तसे मर्यादितच आहेत. तरीही निदान झाल्यावर उपचारांची दिशा तज्ज्ञांनाठरवता येते. खाद्यांच्या सांध्याला जास्तीतजास्त ताण देणं आणि खांद्याची हालचाल सहजपणे करता येईल याला सर्वाधिक महत्त्व देण्यात येतं. हा उपचार काही आठवडे ते काही महिन्यांपर्यंत घ्यावा लागतो. या काळात वेदना कमी करण्यासाठी काही वैद्यकीय तज्ज्ञ वेदनाशामक-पेनकिलर्स औषधं घेण्याचा सल्ला देतात. जर यातील कोणताच उपचार परिणामकारक ठरत नसेल, तर शोल्डर जॉईन्टची- खांद्याची शस्त्रक्रिया हा अंतिम उपाय ठरतो. सुखायु मध्ये आयुर्वेदाचाही पर्याय खांदे आखडण्याच्या त्रासावर आयुर्वेदात अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. आयुर्वेद ही वैयक्तिक उपचार पद्धती असल्याने फ्रोजन शोल्डरच्या केसमधे एकाच प्रकारे उपचार करता येत नाहीत. प्रत्येक केसचं स्वरूप लक्षात घेऊन उपचार करावे लागतात. या उपचार पद्धतीत हर्बल म्हणजेच विविध वनस्पती, गुग्गुळ, चूर्ण, खनिजं, रस उपचार यातून वातदोष कमी करण्यावर भर देण्यात येतो. वातदोष निर्माण झाल्यावर हा त्रास निर्माण होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणं आवश्यक असतं. याचप्रमाणे वातदोषावर पंचकर्मात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि आयुर्वेदिक तेल यांचा वापर करण्यात येत असल्याने खांद्याचे स्नायू मोकळे व्हायला मदत होते आणि त्यामुळे शरीरातील वातदोष हा सामान्य होऊन फ्रोझन शोल्डरचा त्रास कमी व्हायला लागतो.