
2019-11-13T08:44:07
ब्रेन स्ट्रोक शी लढा! Brain Stroke in Marathi ब्रेन स्ट्रोक हा अत्यंत गंभीर आजार आहे. या सेरेब्रो व्हॅस्क्यूलर एक्सीडेंट (Cerebrovascular Accident) मध्ये मेंदूपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवणाऱ्या नलिका कमजोर होतात. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही. परिणामी ब्रेन स्ट्रोक चा सामना करावा लागतो. यावर तातडीने मदत करता यावी यासाठी ब्रेन स्ट्रोक ची लक्षणे लक्षात ठेवायला हवीत. यात थकवा येतो, चेहरा, हात-पाय आणि शरीराच्या कोणत्याही भागातील संवेदना कमी होतात. डोळ्यांसमोर अंधारी येते. विशेष म्हणजे एका डोळ्याने दिसत नाही. बुबुळे पसरतात. जबरदस्त डोकेदुखी सहन करावी लागते आणि बोलण्यात अडथळे निर्माण होतात. आपल्या आसपास कोणालाही असा त्रास झाल्यास डोक्याखाली उशी ठेवून रुग्णाला झोपवा जेणेकरून मेंदुचा रक्ताचा दबाव कमी होतो. रुग्ण श्वास घेत असेल आणि त्या रुग्णाला काहीही समजत नसेल तर त्याला एका कुशीवर करणे, म्हणजे त्याला ताजी हवा मिळेल आणि कदाचित त्याला उलटी होईल. रुग्णाला कोणत्याही प्रकारचं पेय किंवा खाद्यपदार्थ देऊ नये. रुग्णाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याला अजिबात हलू देऊ नका. आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा अधिक माहितीसाठी संपर्क सुखायु हॉस्पिटल कॅनडा कॉर्नर नाशिक 7420004242