Nashik
08042784087
+919225123839

शास्त्रशुद्ध पद्धतीने वजन कमी करण्यासाठी सूचना Ayu...

update image

शास्त्रशुद्ध पद्धतीने वजन कमी करण्यासाठी सूचना

Ayurvedic Diet for Weight Loss in Marathi


  • शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परीणाम न होता सहज आणि निर्धारीत वेळेमध्ये वजन कमी होणे महत्त्वाचे असते.  

  • शरीराची त्वचा लटकणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे, अशक्तपणा वाटणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे उद्भवणे, गाल खोल जाणे, चेहरा निस्तेज होणे अशा कोणत्याही दुष्परीणामाशिवाय वजन कमी होणे महत्त्वाचे असते.

  • निर्धारित वेळेमध्ये वजन कमी होण्यासाठी आहार नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नेहमीची भाजी - भाकरी, भात-वरण असा आहार सोडून सर्व समावेशक , शरीराच्या सप्त धातुंचे पोषण करणारा, परंतु शरीरातील चरबीचे शोषण करणारा आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

  •  सोबतच शरीरासाठी आपल्या वयानुसार, आपणास करता येईल असा योग्य व्यायाम करणे देखील महत्त्वाचे असते. 

  • खालील आहाराचे वेळापत्रक आम्ही "सुखायु क्लिनिक" मधील रुग्णांसाठी नियमित वापरत असतो. सकारात्मक दृष्टीकोनातून अवलंब केल्यास १०० टक्के वजन कमी होईल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. 

  • मधुमेही रुग्ण सोडून इतर कोणीही सोबतच्या वेळापत्रकानुसार आपले वजन कमी करू शकतात. थायरॉईड व स्त्रियांमध्ये पी.सी.ओ.डी. च्या रुग्णांमध्ये या वेळापत्रकानुसार अपेक्षित फायदा होत नाही.


आहारावेळापत्रकापुर्वी व्यायाम महत्त्वाचा...

  • दररोज चालण्याचा व्यायाम करावा. 

    • ३ ते ४ किलोमिटर पायी जाणे-येणे करावे. 

    • आपले चालणे भराभर असावे, एका  मिनिटाला १०० ते १२० लांब लांब पावले पडायला हवी.  झपझप चालावे , 

    • चालताना दम लागणे आवश्यक आहे. घाम येणे आवश्यक आहे. 

    • लयबध्द पध्दतीने चालावे

    • चालताना पायांमध्ये योग्य मापाची पादत्राणे (शक्यतो स्पोर्ट्स शुज) घालावीत. 

    • घराच्या बाहेर चालायला जाणे शक्य नसेल तर…

      •  घरच्या घरी ५-१० मिनीटे दंड बैठका, 

      • ५-१० मिनीटे दोरीच्या उडया , 

      • ५-१० मिनीटे सिट अप्स , 

      • ५-१० मिनीटे पायऱ्या  चढ - उतर करणे,  

      • १०-२०  मिनीटे  घराच्या गच्ची वर  चालणे असा व्यायाम करावा, 

      • ५ ते १० मिनीटे सायकल चालवावी.  

      • एकुण ४० ते ६० मिनिटांचा दररोज व्यायाम होणे महत्त्वाचा. 

      • नियमित  व्यायाम  करणे हे वजन कमी करण्यामागची गुरुकिल्ली आहे. 


आठवडाभर पाळण्यासाठी  काही नियम

  • सतत उकळून आटविलेले गरम पाणीच प्यावे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 

  • आहारामध्ये चवीनुसार  आले (आर्द्रक), पुदिना, लसुन, काळेमिरे, धने, जिरे लिंबु यांचा भरपुर वापर करावा 

  • या शिवाय  त्रिफळा पावडर, चित्रक, नागरमोथा, मुलतानी माती, कुळीथ, वावडींग, अर्जुन, सारिवा, मंजिष्ठा  या चूर्णांचे  मिश्रण करुन कोरडे पावडर अंगावर घासणे म्हणजे उद्वर्तन होय. या पावडरच्या मालीश ने वजन कमी होताना त्वचेवर होणारे दुष्परीणाम कमी होतात. 

  • नियमित मालिशने त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचेचा टोन टिकुन राहतो, त्वचेचा रंग  उजळतो. दररोज आंघोळीच्या वेळेस या पावडरची अंगावर ३० मिनिटापर्यंत मालिश करावी.

  • शक्यतो गव्हाचा आहारात अंतर्भाव टाळावा. त्याऐवजी बाजरी, नाचणी, ज्वारी किंवा तांदळाची भाकरी घ्यावी. 

  • रात्रीचा आहार सूर्यास्तापुर्वी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा.

  • खालील आहार वेळापत्रकासोबत  नियमित वेळेस कमी साखरेचा चहा, दुध, कॉफी घेऊ शकता.  



सोमवार

(पाचक आहार)


  • जवळपास सर्वांना सोमवार ते रविवार पर्यंत एखाद्या तरी उपवासाची सवय असते. दिवसभर उपाशी राहणे, रात्री  एकदा जेवण करणे अशी सर्वसाधारण आपली पध्दत असते. 

  • त्याच पध्दतीने आमच्या वेळापत्रकानुसार व आयुर्वेदानुसार पहिल्या दिवशी आपणास दिवसभर फक्त ताज्या दह्याचे ताक पिऊन राहायचे आहे, ताक पातळ असावे, चांगले घुसळून लोणी काढून घ्यावे. 

  • ताकामध्ये लसुण , आले , पुदिना, काळेमिठ ही  चरबीचे शोषण करणारी  व अन्नाचे पाचन करणारी औषधी द्रव्ये  योग्य मात्रेत घालावीत.

  • याच पध्दतीने  २ थेंब तेल, कडीपत्त्ता, कोथींबीर , हिरवी मिर्ची, लसुन यांची फोडणी दिऊन बनविलेला मठ्ठा  देखील चालतो. 

  • सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० ग्लास या प्रमाणात आपण ताक किंवा मठ्ठा घेऊ शकता. रात्री मात्र विनातेल तुपाची एक किंवा अर्धी भाकरी - चपाती व हळद-बेसन, लसुन - आले घालुन बनविलेली पातळ दह्याची कढी  दोन वाटी या प्रमाणात घ्यावे.
            आहे ना गंमत उपाशी राहणे ही नाही व पोटभरुन खाणे ही नाही.



मंगळवार 

(व्हिजीटेबल डायट)


  • मंगळवारी आपणास पालेभाज्यांचे रस  किंवा सुप्स घ्यायचे आहेत. 

  • पालक सुप, टोमॅटो सुप, गाजर रस, पत्ता-कोबी  रस, बीट ज्युस, दुधी भोपळा किंवा काकडीचे रस  सकाळ पासून संध्याकाळपर्यंत   पोट भरुन घेऊ शकता. 

  • मात्र पालेभाज्या वाफवुनच त्यांचे सुप बनवावे किंवा रस काढावे. 

  • दुसरे महत्त्वाचे प्रत्येक रस किंवा सुप मध्ये पुदिना, आले, लसुन, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीदाना, धने, जिरे, मोहरी आवश्यकते नुसार भरपुर प्रमाणात घ्यावी. 

  • रात्री  भुक लागल्यास एक-दीड  वाटी भात व आले-लसूण  घालुन बनविलेले पातळ मुगाचे किंवा मसुराचे वरण घेऊ शकता.


बुधवार 

(फ्रुट डायट)


  • ताजी गोड फळे किंवा फळांचा रस. सफरचंद, डाळींब, संत्रे, मोसंबी, टरबुज, पपई ही फळे आपण पोटभरुन खाऊ शकता. 

  • आयुर्वेदिय नियमाप्रमाणे फळावर काळेमिरे पावडर घेण्याचे विसरु नका.  

  • मध्यंतरी भुक लागल्याची संवेदना झाल्यास नारळ पाणी प्यावे, किंवा बिनासाखरेचे लिंबु पाणी व काळे मीठ प्यावे. यामुळे भुक कमी होते व  शरीरात उर्जा टिकून राहते.

  • शरीरात हलकेपणा जाणवू लागतो, सुस्ती-आळस कमी होतो, उत्साह वाढतो. 

  • वजन दीड ते दोन किलो ने कमी झालेले जाणवायला लागते.


गुरुवार

(फळभाज्या कॉम्बी डायट)

  • सकाळी :- पोट भरुन कोशींबीर. आले, लसुण , पुदिना, काळेमिरे पावडर घ्यायला विसरु नका. 

  • दुपारी :-     सफरचंद, अननस, पपई, टरबुज, डाळींब, संत्रा यापैकी कोणतेही एक ताजे गोड फळ किंवा नारळ पाणी. किंवा अननस ज्युस. पण साखर नको.

  • संध्याकाळी :-   भरपुर पालेभाज्या-मुग डाळ - तांदुळ, लसुन , आद्रक घालुन बनविलेली एक वाटी खिचडी  व   सोबत  दोन वाटी लसुण - आले घालुन बनविलेली पातळ कढी .



शुक्रवार 

(प्रोटिन डायट)


  • सकाळी :- ( मांसाहारी असाल तर)  पिवळा भाग काढून एक उकडलेले अंडे किंवा १ वाटी वाफवलेले मोड आलेले मुग किंवा मटकी, सोयाबीन किंवा चणे  सोबत चवीनुसार आले, लसुन, मेथीदाना ,  कडीपत्त्ता, कोथीबीर, धने, जीरे.

  • दुपारी :-  उकडलेले मुग किंवा मुग-तुरीचे पातळ वरण 

  •  संध्याकाळी :-      एक ते दोन वाटी मुगाचे घट्ट वरण



शनिवार

(ग्रीन ब्लड डायट)


  • सकाळी :-  एक कप बिनासाखरेचे गोड दुध, दुधामध्ये आले-हळद-तुळस घालून उकळून प्यावे. सोबत २-३ मारी बिस्किट घेऊ शकता. 

  • दुपारी :-  वाफवलेल्या पालेभाज्यांचा रस.

  • संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप  किंवा एक ज्वारीची पातळ भाकरी व एक वाटी मुगाचे किंवा तुरीचे पातळ वरण खावे. 


रविवार 

(प्रोटिन व्हिजिटेबल डायट)


  • सकाळी :-  सोललेल्या मुगाचे घट्ट वरण १-२ वाटी त्यास दोन थेंब तेलाची, मोहरी-आले -लसुणाची फोडणी द्यावी.

  • दुपारी :- भरपूर पालेभाज्या-मुग डाळ - तांदुळ, लसुन , आले घालुन बनविलेली एक वाटी खिचडी  व सोबत  दोन वाटी लसुन , आद्रक घालुन बनविलेली पातळ कढी .

  • संध्याकाळी :-  पालेभाज्यांचे सुप


            या पध्दतीने वजन कमी केल्यानंतर आपला चेहरा आकर्षक, शरीर साचेबध्द दिसेल. शरीरातील सुस्ती, मरगळ, आळस निघून जाईल.   कोठेही उपाशी राहायचे नाही , तेल-भातासारखे पदार्थ बंद करायचे नाही, आयुर्वेदाचे आहाराबद्दल सर्व नियम पाळायचे मग निश्चितच तुमचे वजन कमी होईल. शरीराची प्रोटिन, , लोहाची ही गरज भागते अन  वजनही सहज कमी होते, दुष्परीणाम ही काही होत नाही. 


सुखायु हेल्थकेअर

कॅनडा कॉर्नर

नासिक

७४२०००४२४२


 2023-04-27T13:00:42

Keywords

नर सि ची ेर ्द पल बन ोग दे पप यु तर मत रस लण गो मस कि शी दी सण णी रू ने बल जी ्व णत सत णज ते जन ये ोय सु ेब सू ोण मी िष रव बु शिव वाव ल्थ ापर कुण ाला जरी वार न्न दोन ायल ीपत लतो ाभर मिर बीर महत िरे यदा रुन वुन गरज तुम मरग बिस लून ाळी सहज भाग पिव त्त साल भवण पाल ननस रबी ्रो लिन बिन ामु परत ींब मोस ाहतो मारी लिशन हिजि ालीश र्तन मुगा लोहा दुसर या प म्बी यावी यमाप विसर ालुन कोथी त्सा मांस पाती यापै त्रा र्धी रचंद तुपा िसरु िनात वश्य ्जुन पादत पावल झपझप ोल ज ्यतो ारित ारीत मिनी दोरी गुरु िल्ल होता याही थायर मिनि गावर पायी शोषण रिवा ुळीथ सोबत ालील पिणे ाराम ीनुस ानुस पोषण पणास दररोज ाहारी वेदना तांदु नुसार यायाम थीदान ापत्र रुग्ण ुमेही भाज्य मोहरी ल्यास िलेली त-वरण ोताना भरपुर निघून प्रयत ाद्या पवासा भरपूर िलोमि ी पात ांगले ग्लास रणारी ग्रीन लावीत स्पोर जाणवू ालतान लागतो वलेल्य दुपारी रीर सा णि निर पदार्थ समावेश मिश्रण दिवसभर आपण पो नियमित ारात्म ुलतानी ोनातून वण्यास ताज्या गरमोथा रात्री शरीरास ्स शुज पुदिना पहिल्या पद्धतीन मात्रेत पेक्षित शक्तपणा मात्र प स्त्रिय मग निश् लागल्या मुग-तुरी हळद-बेसन शरीरातून दुष्परीण प्रमाणात दुधी भोप शरीरातील ल-भातासार ास्त्रशुद िलेले गरम हार सोडून सोललेल्या Weight Loss Marathi शरीरावर ना Ayurvedic Diet

Related Posts

update image

Struggling to Gain a Healthy Weight? Sukhayu Hospi...

2025-06-26T10:32:07 , update date

 2025-06-26T10:32:07
update image

Advanced Arthroscopic ACL Repair Surgery by Dr. Ku...

2025-06-25T12:03:42 , update date

 2025-06-25T12:03:42
update image

TALLOGEN EFFLUVIUM (HAIR FALL): UNDERSTANDING & TR...

2025-06-25T11:49:46 , update date

 2025-06-25T11:49:46
update image

Pilonidal Sinus Surgery with Z-Plasty: Advanced Ca...

2025-06-25T11:40:29 , update date

 2025-06-25T11:40:29

footerhc